जळगाव : प्रतिनिधी
येथील टॅलेंट टेन क्रिकेट फेडेरेशन ऑफ इंडिया’ प्रायोजित तथा ‘जळगाव टी-10 क्रिकेट असोसिएशन, जळगाव’ यांच्यातर्फे नरेंद्राशिष जळगाव प्रिमिअर लिग लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
जळगावात सोळा वर्षातील क्रिकेट खेळाडूंची टॅलेंट टेन नरेन्द्राशिष जळगाव प्रीमियर लीग जे. पी. एल. लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा स्पर्धेचे उद्घाटन महापौर जयश्री माह्ज्न यांच्या हस्ते स्पर्धेसाठीच्या धावपट्टीचे पूजन, नाणेफेकीसह क्रिकेट खेळून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ होऊन सामन्याला सुरूवात झाली. याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील, इंजि.राहुल सोनवणे, सागर शामकांतदादा सोनवणे, सतनामसिंग बावरी, लिंगायत समाज अध्यक्ष संदिप वाणी आदी यांच्यासह असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, क्रिकेटप्रेमी व क्रिकेट संघांतील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.