जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरात नाशिक येथील उद्योजकाने सी सल्ट स्पा सेंटर सुरु केलेले होते. या ठिकाणी काही महिला व युवती कामास लावलेले होते. या ठिकाणी असलेले परप्रांतीय महिला मालकानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरियाणा राज्यातील २८ वर्षीय महिला ही कामाच्या निमित्ताने जळगावात वास्तव्याला आहे. ती रिंगरोडवरील सी सल्ट स्पा सेंटरवर नोव्हेंबर २०२१ पासून महिला नोकरीला आहे. दत्तू लक्ष्मण माने (रा. नाशिक) हा स्पा सेंटरचा मालक आहे. त्याने महिलेकडून मसाज करून घेतला. त्यावेळी त्याने महिलेशी जबरदस्ती करून अत्याचार केला.
हा प्रकार कुणाला सांगितला तर उरलेला पगार देणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर दुकानातील मॅनेजर दिपक बडगुजर आणि पंकज जैन यांनी देखील अंगाला हात लावून विनयभंग केला. त्यानंतर महिलेला कामावरून काढून टाकले. याप्रकरणी महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी दत्तू लक्ष्मण माने रा. नाशिक, दिपक बडगुजर आणि पंकज जैन दोन्ही रा. जळगाव यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किशोर पवार करीत आहे.
