जळगाव :प्रतिनिधी
शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील पत्त्याच्या खेळात जिंकलेले २५ हजार रूपये मागितल्याच्या रागातून तरूणाला तीन जणांनी लाकडी बॅटने मारहाण केल्या डोक्याला गंभीर दुखापत केल्याची घटना रात्री घडली आहे. याप्रकरणी तीन जणाविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील इम्रान शेख हमीद (वय-२५) हा आपल्या आजीसोब वास्तव्याला आहे. मजुरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी १४ मे रोजी रात्री साडे अकरा ते मध्यरात्री १ वाजेदरम्यान पिंप्राळा हुडको येथील कच्ची खोली भागात पत्त्याचा जुगारात सहभाग घेतला. या खेळात इम्रानने २५ हजार रुपये जिंकले होते. जिंकेलेले २५ हजार रूपये पैसे मागितले. यामुळे जाकिर पठाण, जावेद पठाण, रसुद पठाण सर्व राहणार पिंप्राळा हुडको यांच्यात वाद झाला. जुगाराचे पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते करून घे, अशी धमकी तिघांनी दिली. त्यामुळे इम्रान हा घरी निघून गेला. थोड्यावेळाने जाकिर पठाण, जावेद पठाण आणि रसुद पठाण हे इम्रानच्या घरी आले. त्याठिकाणी लाकडी बॅट इम्रानच्या डोक्याला मारून जखमी केले, तर इतरांनी बेदम मारहाण केली. जखमीअवस्थेत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी इम्रान शेख हमीद यांच्या फिर्यादीवरून रविवारी १५ मे रोजी सकाळी रामानंदनगर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी जाकिर पठाण, जावेद पठाण, रसुद पठाण या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कालसिंग बारेला करीत आहे.