सार्वत्रिक निवडणुका 2022 च्या आरक्षण सोडत चा कार्यक्रम जिल्हाभरात विविध ठिकाणी राबविण्यात आला. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमात अनेक उमेदवारांना उमेदवारी मिळणार असल्याने मोठा उत्साह दिसून आला. यावेळी बरीच नामवंत राजकीय मंडळी सहकार्य करीत उपस्थित होते.
पाचोरा पंचायत समिती
पाचोरा तालुक्यातील १२ पंचायत समितीच्या गणासाठी भडगाव रोडवरील अल्पबचत भवनात उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांचे अध्यक्षतेखाली सोडतीद्वारे आरक्षण करण्यात आले. तहसिलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, अव्वल कारकून भरत पाटील, विस्तार अधिकारी राजकुमार धस, संजय देवकर बी. पी. बागुल यांनी आरक्षण सोडतीसाठी सहकार्य केले.
पाचोरा तालुक्यातील १२ गणापैकी लोहारा अनुसूचित जाती, भोजे अनुसूचित जमाती महिला राखीव, नगरदेवळा व तारखेडा इतरमागास प्रवर्गाच्या महिला राखीव, लोहटार इतर मागासवर्ग, कुरंगी, शिंदाड व बाळद बु” गणासाठी सर्वसाधारण महिला राखीव, बांबरुड (राणीचे), पिंपळगाव (हरे.), जारगांव व कुऱ्हाड खु” या गणात सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. कुरंगी गण महिलांसाठी राखीव झाल्याने पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील यांची पंचाईत झाली आहे. त्यांना त्यांचे ऐवजी त्यांच्या अर्धानीस राजकारणात सक्रिय करावे लागणार आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शरद पाटील, माजी सभापती सुभाष ,बन्सीलाल पाटील, माजी सदस्य अनिल पाटील, शिवदास पाटील, ज्ञानेश्वर सोनार,परेश पाटील, सुनिल पाटील, राजेंद्र साळुंखे सह मोठ्या संख्येने विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्तै व इच्छुक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी अतुल पाटील, सुत्रसंचलन तहसिलदार कैलास चावडे तर उपस्थितांचे आभार निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील यांनी मानले बुऱ्हाणी इंग्लिश स्कूलचा इयत्ता दुसरीत शिक्षण घेत असलेल्या वेदान्त प्रकाश चौधरी या विद्यार्थ्यांने आरक्षणाच्या चिठ्या काढल्या.
पारोळा पंचायत समिती
पारोळा येथील तहसील कार्यालयात पंचायत समितीच्या आठ गणासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात दिग्गज राजकीय मंडळींच्या गणात राखीव आरक्षण निघाल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला असून आता या दिग्गज मंडळीना नवीन गण शोधावा लागणार आहे. सोडतीत आरक्षित गण पुढील प्रमाणे
देवगाव गण अनुसूचित जाती स्त्री वर्गासाठी राखीव तर वसंत नगर अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव निघाली आहे. तामसवाडी गण नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग स्त्री प्रवर्गासाठी राखीव तर शिरसोदे गण सर्वसाधारण स्त्री साठी राखीव आहे. मंगरूळ गण नागरिकांचा मागासवर्गीय पुरुष प्रवर्ग झाला असून शिरसमणी सर्वसाधारण प्रवर्ग, शेळावे गण सर्वसाधारण प्रवर्ग व म्हसवे गण हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला आहे. लोकेश देविदास बारी या लहान मुलाच्या हस्ते ईश्वर चिट्ठी काढून ही आरक्षण सोडत काढण्यात आले.
याप्रसंगी शासनाच्या वतीने अध्यक्षस्थानी तृप्ती धोडमिसे ( IS) उपजिल्हाधिकारी धुळे, या होत्या,तर त्यांना सहाय्यक म्हणून पारोळा तहसीलदार अनिल गवांदे हे होते. त्याचप्रमाणे बैठकीचे सूत्रसंचालन निवासी तहसीलदार राहुल मुडीक, यांनी केले, बी आर शिंदे नायब तहसीलदार संजय गांधी, एस पी पाटील नायब तहसीलदार निवडणूक शाखा, यांच्यासह दिनेश भोई, महेश जाधव यांनी काम पाहिले.
या सोडती दरम्यान विविध पक्षाचे प्रतिनिधी व इच्छुक उमेदवार यांनी आपली उपस्थिती दर्शविली.
यावल पंचायत समिती
तालुक्यात जिल्हा परिषद पाच गट होते नवीन रचनेनुसार आता सहा जिल्हा परिषद गट आणि बारा गट झालेले आहेत आज रोजी जिल्हा परिषद आरक्षण व पंचायत समिती बारा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले.
नायगाव – किनगाव :- सर्वसाधारण, सावखेडा – दहिगाव :- सर्वसाधारण ( महिला ), मारुळ – न्हावी :- ना.मा.प्र ( ओपन ), बामणोद – हिंगोणे :- सर्वसाधारण ( महीला ), डांभुर्णी – साकळी :- सर्वसाधारण ( महीला ), भालोद – पाडळसा :- सर्वसाधारण ( महीला ) असे असून आता गटनिहाय सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार कामाला लागलेले आहेत इच्छुकांची संख्या आज रोजी तरी वाढीव दिसून येत असली तरी पक्षनिहाय त्याच्या लायकीनुसार व कर्तबगारनुसार उमेदवारांना उमेदवारी मिळणार आहे
पाचोरा नगरपालिका
पाचोरा नगरपरिषद पाचोरा सार्वत्रिक निवडणूक – २०२२ आरक्षण सोडत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे आदेशानूसार दि. २८ जुलै २०२२ रोजी दुपारी ३ वाजता नगरपरिषद सभागृह येथे आयोजीत करण्यात आलेला होता. त्यानूसार एकूण १४ प्रभागांमधून २८ सदस्य संख्या यापुर्वीच निश्चीती झालेली होती. त्याअन्वये दि. १३ जुन २०२२ रोजी अनुसुचीत जाती, अनुसुचीत जाती (महिला), अनुसुचीत जमाती, अनुसुचीत जमाती (महिला) करीताचे आरक्षण निश्चीत करण्यात आलेले होते. दि. २८ जुलै २०२२ रोजी नागरीकांचा मागासप्रवर्ग, नागरीकांचा मागासप्रवर्ग (महिला), महिला व सर्वसाधारण प्रवर्गाकरीता खालील प्रमाणे आरक्षण सोडत काढण्यात आली. यात प्रभाग क्रं. ८ (अ), १३ (अ) व १४ (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग तर प्रभाग क्रं. ३ (अ), ४ (अ), ५ (अ) व ९ (अ) हे प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) राखीव झाले आहे. या सोडती प्रसंगी पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल हे होते. तर तहसिलदार कैलास चावडे, न. पा. मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर, उपमुख्याधिकारी डी. एस. मराठे, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, प्रा. गणेश पाटील, किशोर बारावकर, दत्ता जडे, अजहर खान, प्रविण ब्राम्हणे, समाधान मुळे, गोविंद शेलार, शाकीर बागवान, सईस शेख उपस्थित होते.
प्रभाग क्रं. १ (अ) अनुसूचित जाती (महिला), प्रभाग क्रं. १ (ब) – सर्वसाधारण, प्रभाग क्रं. २ (अ) – अनुसूचित जाती (महिला), प्रभाग क्रं. २ ( ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रं. ३ (अ) – नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला), प्रभाग क्रं. ३ (ब) – सर्वसाधारण, प्रभाग क्रं. ४ (अ) – नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला), प्रभाग क्रं. ४ (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रं. ५ (अ) – नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला), प्रभाग क्रं. ५ (ब) – सर्वसाधारण, प्रभाग क्रं.६ (अ) – अनुसूचित जमाती, प्रभाग क्रं. ६ (ब) सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रं. ७ (अ) अनुसूचित जाती, प्रभाग क्रं. ७ (ब) – सर्वसाधारण (महिला ), प्रभाग क्रं. ८ (अ) – नागरिकांचा मागासप्रवर्ग, प्रभाग क्रं. ८ (ब) – सर्वसाधारण ( महिला ), प्रभाग क्रं. ९ (अ) – नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला), प्रभाग क्रं. ९ (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रं. १० (अ) सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रं. १० (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रं. ११ (अ) – सर्वसाधारण (महिला ), प्रभाग क्रं. ११ (ब) – सर्वसाधारण, प्रभाग क्रं. १२ (अ) – सर्वसाधारण (महिला ), प्रभाग क्रं. १२ (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रं. १३ (अ) – नागरिकांचा मागासप्रवर्ग, प्रभाग क्रं. १३ (ब) सर्वसाधारण ( महिला ), प्रभाग क्रं. १४ (अ) – नागरिकांचा मागासप्रवर्ग, प्रभाग क्रं. १४ (ब) – सर्वसाधारण (महिला) या प्रमाणे आरक्षण जाहिर झाले आहे. सदर आरक्षण सोडतीवर हरकती व सुचना दि. २९ जुलै २०२२ ते १ आॅगस्ट २०२२ पावेतो मागविण्याचा कालावधी आहे.
सदर आरक्षण सोडतीकरीता गो. से. हायस्कूल मधील इयत्ता ८ वी चे विद्यार्थी चि. भार्गव राजेंद्र मानकरे व कु. वैष्णवी गोपाल पवार या विद्यार्थ्यांच्या हस्ते सर्वांसमोर चिठ्ठी काढण्यात आली. सदर प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले व सदर प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे व राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशांन्वये पुर्ण करण्यात आली. आरक्षण सोडत प्रसंगी संगणक अभियंता मंगेश माने, विधी अधिकारी भारती निकुंभ, लिपीक विशाल दिक्षीत, लिपीक ललित सोनार, किशोर मराठे सह अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी उपस्थितांचे आभार मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांनी मानले.
भडगाव नगरपरिषद
भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२२ करिता प्रभाग निहाय आरक्षण सोडत कार्यक्रम दि. २८ रोजी दुपारी ३ वाजता छत्रपती संभाजी महाराज सभागृह (नगरपरिषद टाऊन हॉल) बाळद रोड भडगाव येथे लक्ष्मीकांत साताळकर उपविभागीय अधिकारी चाळीसगाव भाग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी प्रभाग आरक्षण संदर्भातील सर्व माहिती उपस्थित नागरिक, प्रतिनिधी यांना दिली.
भडगाव शहरातील एकूण १२ प्रभागात प्रत्येकी २ याप्रमाणे २४ जागा आहेत. त्यापैकी अनुसूचित जाती करीता १ जागा, अनुसूचित जमाती करीता २ जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग ६ व उर्वरित १५ जागा सर्वसाधारण प्रवर्गा करिता उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
प्रभाग क्र. १ मध्ये अ)अनुसूचित जमाती (महिला ) व ब)सर्वसाधारण, प्रभाग क्र. २ मध्ये अ)सर्वसाधारण (महिला), ब)सर्वसाधारण, प्रभाग क्र. ३ मध्ये अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ब)सर्वसाधारण, प्रभाग क्र. ४ मध्ये अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग ब)सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. ५ मध्ये अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)ब)सर्वसाधारण, प्रभाग क्र. ६ मध्ये अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग ब)सर्वसाधारण (महिला) , प्रभाग क्र. ७ मध्ये अ) सर्वसाधारण (महिला) ब)सर्वसाधारण, प्रभाग क्र. ८ मध्ये अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग ब)सर्वसाधारण (महिला) ,प्रभाग क्र. ९ मध्ये अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ब)सर्वसाधारण, प्रभाग क्र. १० मध्ये अ) सर्वसाधारण (महिला) ब)सर्वसाधारण, प्रभाग क्र. ११ मध्ये अ) अनुसूचित जाती, ब) सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. १२ मध्ये अनुसूचित जमाती, ब) सर्वसाधारण (महिला)
आरक्षण सोडत चिट्ठी जि.प. मराठी शाळा टोणगाव येथील शालेय विद्यार्थिनी कु. मिताली महेंद्र पाटील व चि. प्रथम महेंद्र पाटील यांनी काढल्या. आरक्षण सभेचे कामकाज नगरपरिषद अधीक्षक परमेश्वर तावडे, नितिन पाटील यांनी पार पाडले. सभेसाठी विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते उपस्थित होते.
एरंडोल पंचायत समिती
येथे पंचायत समिती गणांच्या आरक्षणासाठी प्रांत अधिकारी विनय गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक होऊन आठ गणांच्या जागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले अनुसूचित जाती प्रवर्ग .अनुसूचित जमाती. नामाप्रवर्ग .सर्वसाधारण याप्रमाणे त्या गणांचा प्रवर्ग निश्चित करण्यात आला त्यानंतर त्यामधून पन्नास टक्के महिला आरक्षण काढण्यात आले मयंक सोनवणे (इयत्ता पाचवी) या मुलाच्या हस्ते ईश्वर चिट्ठी काढून अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव करण्यात आला आडगाव गट अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आला पंचायत समिती सदस्य पदासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण पहिल्यांदा निघाले त्यामुळे ते सर्वसाधारण ठेवायचे की अनुसूचित जाती महिला ठेवायचे यासाठी ईश्वर चिट्ठी काढण्यात आली रंवजे बु गण सर्वसाधारण महिला आरक्षित करण्यात आला.
एरंडोल तालुक्यातील पंचायत समिती गणांचे आरक्षण पुढीलप्रमाणे(१)विखरण-अनुसूचित जाती महिला ( २) बांभोरी खुर्द- _अनुसूचित जमाती महिला (३) कासोदा -नागरिकांच्या मागास प्रवर्ग (४) आडगाव-नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला (५) रिंगणगाव-सर्वसाधारण (६) रंवजे सर्वसाधारण महिला साततळी सर्वसाधारण बुद्रुक-सर्वसाधारण महिला (७) तळई-सर्वसाधारण (८) उत्राण अ.ह- सर्वसाधारण.
यावेळी प्रभारी तहसीलदार किशोर माळी. ज्ञानेश्वर आमले .किशोर उपाचार्य .राजेंद्र वाघ. वासुदेव पाटील. नानाभाऊ महाजन. दिलीप रोकडे आदी उपस्थित होते.
भडगाव जिल्हा परिषद
भडगाव पंचायत समितीत गणांसाठी आरक्षण सोडत दि. २८ /७ /२०२२ रोजी सकाळी ११ वाजता रविंद्र भारदे उपजिल्हाधिकारी पुनर्वसन जि. का. जळगाव. या नेमणुक केलेल्या अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. यावेळी व्यासपिठावर भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे, गटविकास अधिकारी आर.ओ.वाघ, निवासी नायब तहसिलदार रमेश देवकर, नायब तहसिलदार राजेंद्र अहिरे, अव्वल कारकुन विजय येवले, लिपीक चेतन राजपुत आदि अधिकारी, कर्मचारी तसेच तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, नागरीक हजर होते. हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम भडगाव पंचायत समितीच्या सभागृहात पार पडला. यावेळी धनश्री वाल्मीक पाटील या लहान बालीकेच्या हस्ते चिठ्ठया काढण्यात आल्या. यात आरक्षण पंचायत समिती गणाप्रमाणे असे निघालेले आहेत.
यात वाडे गणासाठी अनुसुचीत जाती महिला, गुढे गणासाठी अनुसुचीत जमाती महिला, गिरड गणासाठी नागरीकांचा मागास प्रवर्ग, कजगाव गणासाठी सर्व साधारण महिला, आमडदे गणासाठी सर्व साधारण, वडजी गणासाठी सर्वसाधारण असे सदस्य पदाच्या जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. तसेच जिल्हा परीषद गटांसाठी जळगाव येथे सदस्य पदाच्या जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात कजगाव वाडे जि प गटासाठी सर्वसाधारण महिला रक्षण, गुढे वडजी जि प गटासाठी अनुसुचीत जमाती आरक्षण, आमडदे गिरड जि प गटासाठी ओबीसी महिला आरक्षण निघाले आहे.जिल्हा परीषद गटांसाठी तसेच पंचायत समिती गणांसाठी आरक्षण सोडतीची सर्वपक्षियांसह , इच्छुक मंडळी, नागरीकांना प्रतिक्षा होती. भडगाव तालुक्यात ३ जिल्हा परीषद गट आहेत. तर ६ पंचायत समितीचे गण आहेत. जिल्हा परीषद गटांमध्ये तसेच भडगाव तालुक्यात पंचायत समिती गणांमध्ये जागांचे आरक्षणाकडे भडगाव तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, नागरीकांचे लक्ष लागुन होते.




















