भडगाव : प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या वडघे फाट्यानजीक वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून यात तीन जण जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, भडगाव ते वडघे फाट्याच्या जवळ दि १८ रोजी रात्री अकराच्या सुमारास वाळूची उचल करण्यासाठी जात असलेले ट्रॅक्टर पलटी झाले. यामध्ये सुरेश अशोक शिंदे (वय २७, रा. टोणगाव), रवी सुरेश शिंदे (वय २५) आणि मयूर भोई (वय २१, रा. आझाद चौक, भडगाव) हे तीन युवक ट्रॅक्टरखाली दाबले गेले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन या तिघांना रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होत असतांनाच डॉक्टरांनी या युवकांना मृत घोषित केले.
या अपघातामध्ये तर शामराव शिंदे (वय २३), आकाश रामकृष्ण पवार (वय २१) आणि कैलास पवार (वय २१, सर्व रा. टोणगाव भडगाव) हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील सुरेश शिंदे आणि रवी शिंदे हे एकमेकांचे चुलतभाऊ होते. या दोघांच्या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. तर टोणगावातही शोकाचा वातावरण पसरले आहे. रात्री उशीरापर्यंत भडगाव पोलीस स्थानकात नोंदणीचे काम सुरू होते.