जळगाव : प्रतिनिधी
शहरातील दूध फेडरेशन परिसरातील नालंदा बुद्ध विहार आणि सम्यक बुद्ध विहार यांच्यातर्फे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त धम्म रॅली काढण्यात आली. यावेळी समाजबांधव व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
१६ रोजी सकाळी ७ वा. नालंदा बुद्ध विहार येथुन रॅलीला सुरुवात होऊन रॅली सम्यक बुद्ध विहारमार्गे येवून पुढे रेल्वे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ येऊन बुद्ध जयंती शहर उत्सव समिती मध्ये सहभागी होऊन पुढे संत चोखामेळा वस्तीगगृह येथे रॅलीची सांगता करण्यात आली.
या रॅलीमध्ये जळगाव शहरातील समस्त बुद्ध अनुयायांनी पांढरे वस्त्र परिधान करून सहभाग नोंदविला. यावेळी शिवम सोनवणे, मुकेश जाधव , विजय सुरवाडे, नागेश निकम, चंद्रसेन निकम,पंकज पारेराव,पिंटू सोनवणे,मोनू वाल्मिकी,आंनद पवार,शुभम बनसोडे,सागर सोनवणे, कृष्णा महाले,सागर सावळे,अक्षय निकम यांच्यसह परिसरातील समस्त मित्रपरिवार व महिलांनी रॅली यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.