जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वराड येथील शेतातील विहरीत पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वराड येथे राहूल भरत जाधव(वय २८) हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. शुक्रवारी १३ मे रोजी सकाळी मजूर शेतात काम करीत असतांना ते पाणी पिण्यासाठी हिलाल पुंडलिक नेरे यांच्या शेतातील विहरीजवळ गेले. दरम्यान, ते विहरीतून पाणी काढत असतांना त्यांना विहरीत मृतदेह तरंगतांना आढळला. त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ शेतमालकाला दिली. शेतमालकासह सरपंच संदिप सुरळकर, राजेंद्र जाधव, भाऊलाल जाधव, पोलिस कर्मचारी राजेंद्र उगले यांच्यासह ग्रामस्थांनी शेतात धाव घेत पोलिसांच्या मदतीने मृतदेह विहरीतून बाहेर काढला. यावेळी तो मृतदेह राहूल जाधवचा असल्याची समजले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. याठिकाणी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास सचिन मुंढे हे करीत आहे.