वरणगाव : प्रतिनिधी
शहरात गेली तीन चार दिवसा पासून छोट्या छोट्या कारणास्त शहरात अफवा पसरवून वातावरण गढूळ नकरता तरुणाना योग्य मार्गदर्शन करून त्यांना दिशा द्यावी असे पोलीस स्टेशनचे सह्य पो. निरिक्षक अशिष आडसुड यांनी अवाहन केले.
शहरात गेली तीन चार दिवसा पासून बारिक सारीक गोष्टी वरून आफवाचा पेव फुटल्याने सह पोलीस निरिक्षक अडसुड यांनी शातंता कमेटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी तरुणांना लहान सहान गोष्टीं वरून भांडत बसु नका, गर्दी जमवू नका, परिसराचे वातावरण भितीचे व दहशदीचे होणार नाही यांची काळजी घ्या, आपसात चर्चा करून वाद कसे मिटवता येईल याचा प्रयत्न करा असे आवाहन केले. तरुणांना चांगली दिशा दिली पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त करत शहरात येत्या काही दिवसांत मोहल्ला कमिटी स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी उप सह्य पोलीस निरिक्षक परशुराम दळवी, सुधाकर जावळे, सुनिल काळे, शे अखलाक शे युसुफ, गणेश धनगर, मिलींद मेढे, अल्लाउद्दीन शेठ, शे सईद शे भिकारी, महेश सोनवणे, साजीद कुरेशी, अशफाक काझी, प्रदिप भंगाळे, शशी चौधरी, विनोद झोपे यांच्यासह शांतता कमीटीचे सदस्य व नागरिक, राजकिय पदाधिकरी, पत्रकार, नागरिक उपस्थीत होते.