जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील चिंचोली येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणावर चाकूहल्ला केल्याची घटना तालुक्यातील येथे घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी सुरेश धनराज पवार (वय-४०) हा आपल्या कुटुंबीयांसह राहायला आहे. कुणाच्याही शेतातील मिळेल ते काम करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. १३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता मागील भांडणाच्या कारणावरून तुषार प्रमोद कोळी व अविनाश सुभाष दांडगे दोन्ही रा.कुसुंबा ता. जळगाव यांनी चिंचोली गावातील सरकारी दवाखान्याजवळ येऊन सुरेश पवार याला शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर धारदार चाकूने त्याच्या डाव्या पायावर वार करून गंभीर जखमी केले आहे. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी गुरुवार १४ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता सुरेश पवार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी तुषार प्रमोद कोळी व अविनाश सुभाष दांडगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफार तडवी करीत आहे.