तुमची ‘अप्सरा’ म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने काही महिन्यांपूर्वीच तिचा प्रियकर कुणाल बेनोडेकर विवाहबंधनात अडकली आहे. दोघांचे लग्न 7 मे रोजी दुबईमध्ये पार पडले. सोनालीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
अगदी कमी वयातच सोनालीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठी सिनेइंडस्ट्रीत एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. सांगण्याची गोष्ट म्हणजे, बऱ्याचदा सोनाली सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते. तर आता ती एका वेगळ्या कारणामुळे चांगलीच पुन्हा चर्चेत आली आहे.
वाचून तुम्हाला देखील धक्का बसेल मात्र सोनाली ही पुन्हा लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चाना वेग आला आहे. 7 मे रोजी कुणाल बांदोडकरसोबत दुबईमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने लग्नगाठ बांधली होती. अवघ्या चार लोकांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं. सोनालीच्या आई-वडिलांनाही या लग्नाला उपस्थित राहता आलं नाही.
तसेच यंदा या दोघांच्या लग्नाला 7 मे रोजी एक वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्तच ही जोडी पुन्हा लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती मिळत आहे. माध्यमांमध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. यावर सोनाली कुलकर्णीने सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत सोनालीने सोशल मीडियावरून माहिती देताना म्हंटले आहे की, ‘आता लग्नाची तयारी धामधुमीत सुरू करण्यात आली आहे. पाहुणे मंडळी आणि मित्रमंडळींना या लग्नासाठी बोलावण्यात येणार आहे, असे सोनाली हिने सांगितले आहे. मराठमोळ्या पद्धतीने माझा हा लग्नसोहळा पार पडेल, अशी माहिती देखील तिने दिली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी 7 मे रोजी सोनाली आणि कुणाल यांचा विवाहसोहळा दुबईमध्ये पार पडला. दोघांनीही फक्त चार नातेवाईकांच्या उपस्थितीत मंदिरामध्ये लग्न केले. भारतात असणाऱ्या सोनालीच्या आईवडिलांनी आणि लंडनला असलेल्या कुणालच्या आईवडिलांनी व्हिडिओ कॉन्फर्न्सिंगद्वारे या लग्नसोहळ्यात उपस्थिती लावली होती.
