
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील कानळदा रोड येथील त्रिभुवन कॉलनीत राहणारा सुनील देविदास पाटील (वय ३३) या तरुणाने घराच्या वरच्या मजल्यावर छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात अालेली नव्हती.
सुनील पाटील हा आई-वडील, भाऊ, पत्नी यांच्यासह वास्तव्याला होता. फोटो लॅबमध्ये काम करुन ताे कुटुंबाला हातभार लावत होता. रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घराच्या वरच्या मजल्यावर झोपायला जातो असे सांगून ताे गेला. बराच वेळ झाला तरी सुनील खाली न आल्याने त्याचा शालक बोलावण्यासाठी गेला असता गळफास घेतल्याचे दिसून आले.
आज अंत्ययात्रा
सुनील याची दि १८ रोजी दुपारी राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे. तर छत्रपती शिवाजी नगरातील वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.





















