अमळनेर : प्रतिनिधी
येथील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले डेबुजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालयाचे संंस्थापक अध्यक्ष लाँन्डी व्यावसायिक दिपक वाल्हे यांना नुकताच “राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार २०२२ ” जाहीर झालेला आहे.
डेबुजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालयाचे संंस्थापक अध्यक्ष लाँन्डी व्यावसायिक दिपक उखर्डु वाल्हे हे गेल्या १५ वर्षांपासून करित असलेल्या सामाजिक कार्य व त्यांनी राबविलेले विविध उपक्रमांची दखल घेऊन माँ जिजाऊ फाऊंडेशन शिरपुर जेन ता.मालेगाव जि.वाशीमच्यावतीने दिला जाणारा यंदाचा “राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार २०२२ ” या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे हा जाहीर झालेला पुरस्कार २ जुन रोजी मान्यवरांच्या हस्ते शिरपुर जैन येथे मोठ्या समारंभात पुरस्काराचे वितरण होणार आहे.
दिपक वाल्हे यांना आतापर्यंत १४ राज्यस्तरीय पुरस्कार तसेच कोरोना काळात केलेल्या विविध उपक्रमाबद्दल १३ कोरोना योद्धा पुरस्कार प्राप्त झाले आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री वाल्हे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .