जळगाव : प्रतिनिधी
भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील भोणे गावाजवळ घडली आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश भिकाजी सोनवणे (वय-४९) रा. पारधीवाडा धरणगाव हे मुंबई येथील गांधी बालविद्या मंदीर कोहीनूर सीटी कुर्ला येथे कला शिक्षण म्हणून नोकरीला आहे. काही दिवसांपुर्वी त्यांच्या आईचे निधन झाल्याने ते धरणगाव येथे आलेले होते. दरम्यान, सुरेश सोनवणे हे गुरूवारी ३१ मार्च रोजी कामाच्या निमित्ताने दुचाकीने दुपारी १२ वाजेच्या सुमारास भोणे गावाच्या दिशेने जात होते. यावेळी भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सुरेश सोनवणे हे जागीच ठार झाले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा धरणगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल खताळा यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ उमेश पाटील करीत आहे
