पाचोरा :प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या क्रिडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या वतीने देण्यात येणारा सन – २०२१ चा जिल्हा क्रीडा पुरस्कार पाचोरा येथील श्री. गो. से. हायस्कूलचे पर्यवेक्षक नरेंद्र रामदास पाटील यांना देण्यात आला आहे. प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व दहा हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
जळगाव जिल्ह्याच्या क्रिडा क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी करून जिल्ह्याची मान वृद्धिंगत केल्याबद्दल जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नरेंद्र रामदास (ठाकरे) पाटील यांना बुद्धीबळ खेळ अंतर्गत गुणवंत क्रिडा मार्गदर्शक पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. दि. १ मे रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, प्रदीप तळवलकर उपस्थित होते. नरेंद्र पाटील यांनी सपत्नीक उपस्थिती देऊन या पुरस्काराचा स्वीकार केला.
याप्रसंगी ज्योती पाटील, चिरंजीव आर्चीक पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक ए. बी. अहिरे, धीरज विसपुते, आर. बी. तडवी, महेश कौण्डिण्य, आर. बी. बाँठिया, पी. एम. पाटील, आर. बी. बोरसे, अरुण कुमावत, सुबोध कांतायन व छाया सूर्यवंशी उपस्थित होते. नरेंद्र पाटील यांना मिळालेल्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, सचिव ॲड. महेश देशमुख, उपाध्यक्ष विलास जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे प्रमुख वासुदेव महाजन तसेच पाचोरा तालुका बुद्धिबळ संघाचे अध्यक्ष दुष्यंत रावल, शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.