रावेर : प्रतिनिधी
“एक तास राष्ट्रवादीसाठी” या कार्यक्रमानिमित्त आज निंभोरा ता रावेर येथे स्थानिक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत राष्ट्रवादी ओबीसी सेलतर्फे तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे यांनी स्थानिक समस्यांच्या संदर्भात अडीअडचणी सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रल्हादभाऊ बोंडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून निंभोरा गणाचे पं स सदस्य श्री दीपक पाटील होते.तर कार्यक्रमास राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष श्री सुनिल कोंडे,निंभोरा सरपंच श्री सचिन महाले,माजी सरपंच तथा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष डिगंबर चौधरी,तालुका सरचिटणीस श्री वाय डी आबा पाटील,सहकारातील मार्गदर्शक श्री बाळासाहेब पवार यांसह व्यासपीठावर मान्यवर हजर होते.
यावेळी बैठकीत माजीमंत्री श्री एकनाथराव खडसे यांनी पक्षातर्फे तातडीने विधानपरिषदेवर घेण्यासाठी हालचाली करण्याबाबत एकमुखी मागणी करण्यात आली.
यावेळी सरचिटणीस वाय डी पाटील यांनी उपस्थितांसमोर ध्येय धोरणे व आजच्या एक तास राष्ट्रवादीसाठी कार्यक्रमाचे प्रयोजन याबाबत माहिती दिली.
ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे आयोजक सुनील कोंडे यांनी एक तास राष्ट्रवादीसाठी या कार्यक्रमाची प्रदेशाध्यक्ष ना श्री जयंतराव पाटील,जिल्हाध्यक्ष ऍड.श्री.रवींद्रभैय्या पाटील यांच्या आदेशाप्रमाणे तळागाळातील सर्वसामान्य नागरिक,शेतकरी,ज्येष्ठ नागरिक,युवक आदींच्या स्थानिक समस्या सोडविता याव्यात या अनुषंगाने कार्यक्रमाबाबत माहिती दिली.व आपल्या परिसरतीलसमस्या सुचविण्याबाबत ग्रामस्थांना आवाहन केले.
या वेळी कार्यक्रमात शेतकरी धनराज खाचणे,कैलास येवले यांनी शेतरस्त्याबाबत अडचण सांगत समस्या सोडविण्याबाबत तर एम टी बोंडे,दत्तात्रय पवार,पितांबर भिरुड,बाळासाहेन पवार आदी ज्येष्ठ नागरिकांनी निवेदन देत ज्येष्ठ नागरिक भवन मिळण्याबाबत मागणी केली.प्रा दिलीप सोनवणे यांनी माजी सैनिकांच्या कुटुंबाची व्यथा मांडत ५०वर्षांपासून प्रशासनाकडे खेटे घालावे लागत असल्याने याबाबत न्याय मिळण्याची मागणी केली.
तसेच गावातील पीण्याच्या पाण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून आर ओ प्लॅन्ट ची मागणी केली.
माजी सरपंच डिगंबर चौधरी यांनी गावातील सांडपाण्याच्या विल्हेवाटीसाठी व खिर्डी ते जुना शिंगाडी रस्ता नूतनीकरण यासाठी खासदार रक्षाताई खडसे यांच्याकडे जाण्याबाबत मागणी केली.
रतन वाघ या युवकाने हा कार्यक्रम राष्ट्रवादीने घेतल्याबाबत सर्वांचे आभार मानले व वॉर्ड क्र ०६मध्ये दलित व मुस्लिम वस्ती मोठ्या प्रमाणावर असल्याने सांडपाणी,गटारी,आदींच्या समस्यांबाबत सांगितले.
माजी ग्रा पं सदस्य मधुकर बिऱ्हाडे यांनी शहरी व ग्रामीण भागात घरकुल योजनेतील अनुदानित रकमेत मोठी तफावत असून ती दूर करून ग्रामीण भागातील घरकुलाचे अनुदान वाढविण्याबाबत मागणी केली.
बाळासाहेब पवार यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून होत असलेल्या रस्त्यात आमची जमीन जात असून याबाबत न्याय मिळण्याची मागणी केली.
महिला कार्यकर्त्या आशाबाई सोनवणे यांनी धनगरवाडा परिसरात अंगणवाडी सुरू करण्याची मागणी केली.तसेच धनगर समाजासाठी मंगल कार्यलयाची मागणी केली.
हर्षल ठाकरे यांनी तरुणांसाठी व्यायामशाळा बनली असून त्यात साहित्य नसल्याबाबत सांगितले तसेच तरुणांना खेळण्यासाठी क्रीडांगण,अभ्यासासाठी अभ्यासिका तसेच पिण्याच्या पाण्याबाबत सुचविले.
जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे यांनी ३१ मार्चपर्यंत शासनाने शेतकऱ्यांना कृषिसंजीवनी योजनेचा लाभ देऊन विजबिलांच्या ५०%रक्कम माफी च्या योजनेची मुदतवाढ शासनाकडून मिळण्याबाबत मागणी केली.
ग्रा पं सदस्य मनोहर तायडे यांनी सामाजिक न्याय तर्फे १५%मिळणारा निधी मागास वर्गासाठी २२% करण्याबाबत प्रशासनाकडे मागणी केली. ग्रा पं सदस्य दिलशाद शेख व राज खाटीक यांनी वॉर्ड क्र.०५साठी रस्ते,पेव्हर ब्लॉकची मागणी केली.
पत्रकार दस्तगिर खाटीक यांनी वॉर्ड क्र.०६साठी मंगल कार्यालय,व मूलभूत सुविधांबाबत सांगत गावातील हा सर्वात मोठा वॉर्ड असल्याने याच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष लक्ष देण्याची मागणी केली.
राष्ट्रवादी शहराध्यक्ष अतुल पाटील यांनी मरीमाता परिसरात ३५वर्षानंतर ही गटारी व रस्ते नसल्याबाबत सांगितले.त्या भागात सर्व शेतकरी राहत असल्याने त्या भागात प्राधान्य देण्यात येऊन गटारी करण्याची मागणी केली.संदीप महाले यांनी दलित वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविण्याबाबत मागणी केली.
यावेळी सरपंच सचिन महाले यांनी समस्या समजून घेत स्थानिक समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्यात येईल असे सांगत उर्वरित प्रश्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे कैफियत मांडणार असल्याचे सांगितले.
पं स सदस्य दीपक पाटील यांनी स्थानिक ज्या मागण्या आहेत त्या तालुकास्तरावर,जिल्हास्तरावर मांडण्यात येऊन तक्रारी व मागण्या कळविण्यात येतील असे सांगत माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीबाबत मागणी केली.तसेच राज्य सरकारच्या संबंधित मागण्यांचा ही आम्ही पाठपुरावा करू असे सांगत या कार्यक्रमाचे नियोजन केल्याबाबत निंभोरा राष्ट्रवादीचे कौतुक केले.
यावेळी कार्यक्रमास श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनिल ब-हाटे,दस्तगिर खाटीक,विशाल तायडे,दत्तात्रय पवार, संदीप खाचणे,अतुल पाटील,धनराज बावस्कर, विजय बा-हे,लक्ष्मण ब-हाटे,चंद्रभान सूर्यवंशी,अरविंद भंगाळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी सर्वांनी आपापल्या परिसरातील समस्या मांडल्याबाबत सुनील कोंडे यांनी आभार मानत पुढील महिन्याच्या पहिल्या सोमवारी पुन्हा याबाबत बैठक घेऊन यातील कोणती कामे झाली व कोणती कामे वरिष्ठांकडे सोपविण्यात आली याबाबत माहिती देऊ असे सांगत उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला.
