पाचोरा : प्रतिनिधी
नुकत्याच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुका संपन्न झाल्या. यात पाचोरा – भडगाव मतदारसंघ युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाचोरा येथील शेख शकील शेख इब्राहिम हे आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा प्रचंड मताने निवडून आले. त्यांच्या या निवडीबद्दल पाचोरा व भडगाव तालुक्यात युवकांमध्ये उत्सवाचे वातावरण असून शेख शकील यांच्या नेतृत्वात युवकांची मजबूत फळी या विधानसभा मतदार संघात निर्माण करण्याचे काम होणार आहे. येत्या काळात युवकांचे संघटन करून संपूर्ण मतदारसंघात युवक काँग्रेसच्या शाखा उघडण्याचे काम करण्यात येणार आहे.
शेख शकील शेख इब्राहिम त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत, जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्र पाटील, डॉ. उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी, प्रदेशसचिव विनोद कोळकर, माजी प्रदेश सचिव डी. जे. पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी जिल्हा अध्यक्ष युवक काँग्रेस अॅड. अविनाश भालेराव, विकास वाघ, साहेबराव पाटील, नंदकुमार सोनार, मुक्तार शहा, प्रा. एस. डी. पाटील, प्रताप पाटील यांनी शेख शकील इब्राहिम यांचे अभिनदंन केले. तसेच त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनदंन केले जात आहे.