पाळधी ता.धरणगाव : प्रतिनिधी
येथील रहिवासी रुपेश सोनवणे ,रुमलबाई पाटील, जुबेर देशमुख, राजेंद्र चौधरी यांना वैद्यकीय व इतर शासकीय योजनांसाठी रेशन कार्डची असणारी आवश्यकता लक्षात घेऊन दक्षता व नियंत्रण समिती सदस्य दिपकराव सावळे यांनी संबंधितांकडून आवश्यक कागदपत्र जमा करत जि प सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने नवीन रेशन कार्ड तयार करून देण्यात आले. धरणगाव पुरवठा विभागाकडून कागदपत्रांची पूर्तता करत संबंधित गरजवंतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नवीन रेशनकार्ड प्रदान करण्यात आले. यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील माजी सरपंच अलीम देशमुख, महेंद्र चौधरी आदींची उपस्थिती होती.
