पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंप्री प्र.ऊ. विविध कार्यकारी सोसायटीच्या १२ जागांसाठी २२ मे रोजी निवडणुक घेण्यात आली. या १२ जागेंच्या लढतीत १२ पैकी १२ जागांवर शिवसेनेने विजय मिळवत पिंप्री प्र.ऊ. विकासोवर शिवसेनेचा भगवा फडकविला आहे.
यात रामकृष्ण गंभीर पाटील, राजेंद्र भिमराव पाटील, अरूण भगवान पाटील, गोपाल भाईदास पाटील, राजेंद्र शालिग्राम पाटील, भास्कर केशव पाटील, काळु पोपट पाटील, विश्राम महादु पाटील, पाटील लिलाबाई शिवाजी, मंगलबाई सुभाष पाटील, शंकर बापु पाटील व अर्जुन चैत्राम विसावे यांनी विजय संपादन केला. या सर्व विजयी उमेदवारांचा आ. चिमणराव पाटील यांनी सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जि.प.मा.कृषि सभापती डाॕ.दिनकर पाटील, राजेंद्र भगवान पाटील, भैय्यासाहेब रामलाल पाटील, दयाराम पाटील, हिम्मत दयाराम पाटील, धर्मा पाटील, सुभाष पाटील, महादु पाटील, बाळु पाटील, छोटु पाटील, प्रकाश सुकदेव पाटील, प्रकाश धनराज पाटील, गंजीधर सुपडु पाटील, रावण पाटील, अमृत पाटील, युवराज धुडकु पाटील, भाऊसाहेब भाऊराव पाटील, अजय शिवाजी पाटील अशोक भिल यांचेसह ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.