मुक्ताईनगर : प्रतिनिधी
मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे सालाबादाप्रमाणे भीम स्टार फाउंडेशन तर्फे दिनांक 20 मे रोजी बौद्धधर्मीय सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संस्थेचे पदाधिकारी व मान्यवर मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
भीमस्टार फाउंडेशन ही सामाजिक संस्था नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून विविध उपक्रम राबवित असते. त्याच अनुषंगाने बौद्ध समाजात गरीब कुटुंबांना उपवर मुला-मुलींचे लग्न या महागाईच्या काळात खर्च करणे शक्य नसल्याने व अनाठायी खर्च होऊ नये, म्हणून सामूहिक बौद्ध पद्धतीने विवाह सोहळा आयोजित केला. त्यात एकूण 55 जोडप्यांची लग्न लावून देण्यात आली.
धम्म पिठावर पूज्य भन्तेजी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रमुख पाहुणे यांचे उपस्थितीत तथागत भगवान गौतमबुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन करून वंदन करण्यात आले. सामूहिक बुद्ध वंदना घेऊन, पुज्य भन्तेजी व भारतीय बौद्ध महासभेचे विभागीय सचिव के.वाय.सुरवाडे यांनी बौद्ध पद्धतीने मंगल परिणय सोहळा विधी करून एकूण 55 जोडपी यांचे लग्न लावून दिले.
धम्मपिठावर मान्यवर मंडळीचे संस्थेच्या वतीने फुलहार, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवर व प्रमुख पाहुणे यांनी नव वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक इंगळे व प्रेरणास्थान मा. एन.जी.शेजोळे यांनी दैनिक लोकशाहीशी बोलतांना सांगितले की, संस्थेच्या माध्यमातून विविध संघटनेच्या सहकार्याने आम्ही विविध सामाजिक हिताचे कार्यक्रम नेहमीच राबवत असतो. दोन वर्ष कोरोना काळात खंड पडला होता. या वर्षी हा बौद्ध समाजाचा सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात करून यात 55 जोडपे बौध्द पद्धतीने विवाहबद्ध झाले. आम्ही कुणाकडून दान वगैरे घेत नसून स्वतः हा उपक्रम राबवतो व गावकरी लोकांचा देखील यात हिरारीने सहभाग असतो. त्यांचे सहकार्य आम्हाला लाभते. या नवीन वधूवरांना शासनामार्फत समाजकल्याण विभागाकडून आम्ही प्रकरणे सादर करून आर्थिक मदत म्हणून रुपये 20,000 चा धनादेश मिळवून देतो.
या सोहळ्याला प्रमुख उपस्थित पाहुणे म्हणून आ. चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी सौ यामिनी पाटील व कन्या संजना पाटील, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन रोहिणीताई खडसे, भारतीय बौद्ध महासभेचे विभागीय सचिव के.वाय.सुरवाडे, भीमराव पवार, प्रा.डॉ.संजय साळवे, राहुल सोनवणे, वंचितचे जिल्हा प्रवक्ता ऍड.विनोद इंगळे, निळे वादळ संघटनेचे अध्यक्ष अशांत वानखेडे, सावदा माजी उपनगराध्यक्ष नंदाबाई लोखंडे, समाजकल्याण विभागाचे प्रतिनिधी शीला अडकमोल, साधना शेजोळे, शशिकला पाटील, राजेंद्र अटकाळे, संतोष कोसोदे, निंभोरा सरपंच राजू सवर्णे, बाळा भालशंकर, शेषराव पाटील, मुक्ताईनगर मा.पो.पा.मोहन मेढे, पत्रकार देवानंद पाटील, योगेश पाटील, छबिलदास पाटील, योगराज स्टोनक्रेशरचे संचालक प्रमोदभाऊ सोनवणे, सामूहिक विवाह सोहळा समिती अध्यक्ष दीपक इंगळे, प्रेरणास्थान एन.जी.शेजोळे, उपाध्यक्ष महेंद्र हिरोळे, गजानन सुरवाडे, अनिल वाघ पो.पा. नांदवेल, जितेंद्र पाटील पो.पा. उचंदे, लखन पानपाटील, पंकज तायडे, अमोल बोदडे, निलेश शेजोळे, संतोष झनके, शंकर इंगळे, जगदेव इंगळे, रतन तायडे, विनोद इंगळे, प्रवीण वाघ, जीवन इंगळे, जयराम इंगळे, नीरज इंगळे, महेंद्र इंगळे, नागसेन तायडे, राजू वानखेडे, कल्पेश भालेराव, नरेश इंगळे आदी. भिमस्टार ग्रुप उचंदे व युवा मित्र परिवार, मुक्ताईनगर तालुक्यातील युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आयु.डॉ. मुकेश तायडे, छबिलदास इंगळे व प्रशांत तायडे यांनी केले.