जामनेर : प्रतिनिधी
जामनेर शहरातील ब्राह्मण समाज व ब्राह्मण संस्थेच्या वतीने जामनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. चंद्रकांत भोसले यांना एक निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात ब्राह्मण समाजाचे उत्थापन व विकास होण्यासाठी तसेच हक्काची स्वतःची अशी जागा असावी यासाठी खुला भूखंड किंवा प्लॉट नगरपरिषदेकडून संस्थेला मिळावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद दिला. आपल्या माहितीत असा भूखंड शहरात कुठे आहे का तसे असल्यास तशी माहिती द्या मी त्या दृष्टीने सहकार्य करतो असे आश्वासन दिले.
त्या दृष्टीने कामाला सुरुवात करण्याचे आवाहन समाजबांधवांना करण्यात आले आहे. निवेदन देते प्रसंगी ब्राह्मण संस्थेचे ज्येष्ठ सभासद पी. डी. जोशी सर, अनंतराव जोशी, अध्यक्ष डॉ. नरेंद्र कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीपाद पेडगावकर, सचिव अमोल लंगरे, सहसचिव, विनायकराव जोशी,खजिनदार, सुनील कुळकर्णी, प्रा. सुधिर साठे, सर, माधव देशपांडे.आर. आर. कुळकर्णी, सुनिल डोहळे, गोपाळ देशपांडे, दिनेश जोशी,.पराशर,. अनिकेत हातवळणे , विजय जोशी, विकास ब्रम्हो, शाम जोशी, अनिल देशपांडे, तुषार जोशी, राजेश दलाल, प्रा. किरण कुळकर्णी,अरुण जोशी, सदानंद जोशी, राजेंद्र देशपांडे, राजेश कुळकर्णी,निखिल जोशी यांच्या सह समाज बांधव इ. मान्यवर उपस्थित होते.
