• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

भक्ती ग्रंथाच्या माध्यमातून अध्यात्माचा पाया होईल मजबूत महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज : डॉ. जगदीश पाटील

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 24, 2022
in Uncategorized
0
भक्ती ग्रंथाच्या माध्यमातून अध्यात्माचा पाया होईल मजबूत  महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज : डॉ. जगदीश पाटील
Share on FacebookShare on Twitter

हहग

भक्ती ग्रंथाच्या माध्यमातून अध्यात्माचा पाया होईल मजबूत

महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज : डॉ. जगदीश पाटी लिखित श्री संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती ग्रंथाचे प्रकाशन

भुसावळ – समाजात समरसता तयार करून सकारात्मक समाजनिर्मिती करण्याचे काम संतांचे वाङ्मय करत असते. संत एकनाथांनी परिणामकारक औषधी अत्यंत सोप्या पद्धतीने आईस्वरूप बनून बालरूपी समाजाला दिली. हेच ज्ञान अजून सोपे करून डॉ. जगदीश पाटील यांनी भक्ती ग्रंथाची निर्मिती केली. त्यामुळे आध्यात्मिक पाया मजबुतीसाठी हा ग्रंथ महत्त्वपूर्ण योगदान देऊन लाभदायी ठरेल, असे प्रतिपादन महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले.

डॉ. जगदीश पाटील लिखित श्री संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती या ग्रंथाचे प्रकाशन नाथषष्ठीच्या मुहूर्तावर फैजपूर येथील सतपंथ मंदिरात महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.सौ. आशालता अशोक महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून योगीराज महाराज गोसावी पैठणकर, प्रा.डॉ. पृथ्वीराज तौर नांदेड, डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे, अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे, नरेंद्र नारखेडे, प्रा. व.पु होले, बी.आर. पाटील, प्रा.डॉ. दिलीप ललवाणी, लक्ष्मण महाराज उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन झाल्यावर सौ. निशा पाटील यांच्या प्रतिमेस डॉ. महाजन यांनी पुष्पहार अर्पण केला. मान्यवरांचा परिचय प्रा. उमाकांत पाटील यांनी करून दिला. लेखकाची भूमिका डॉ. जगदीश पाटील यांनी प्रास्ताविकातून मांडली. प्रकाशकाच्या भूमिकेतून हभप लक्ष्मण महाराज यांनी संत साहित्यातून आध्यात्मिक मन:शांती मिळते असे सांगितले.

डॉ. पृथ्वीराज तौर यांनी डॉ. पाटील यांचा शोधप्रबंध हा आदर्श वस्तुपाठ असून एका शिक्षकाने लोकशिक्षक संत एकनाथांच्या पायवाटेवर चालण्याचे काम केले असल्याचे सांगितले. योगीराज महाराज गोसावी यांनी आदर्शभूत अभ्यासपूर्ण मांडणी असलेला व परमार्थ साधक आणि लोकोपयोगी भावना हा उदात्त हेतू ठेवून भक्ती हा ग्रंथ तयार केला असल्याचे सांगितले. महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज म्हणाले की, अध्यात्माची ताकद दुःखातून सावरते. आध्यात्मिकतेचा वारसा बनणे भाग्यशाली असते. संतांचे वाङ्मय तथा अध्यात्म हे मनोबल व आत्मबल वाढवणारे असते असे सांगून हाच वारसा डॉ. पाटील यांनी स्वीकारला असल्याचे त्यांनी सांगितले. डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी डॉ. पाटील हे अध्यात्माच्या खोलात शिरलेले व तंत्रज्ञानाची उंची गाठलेले तसेच पीएचडीचा विषय स्वतः जगून इतरांनाही जगवणारे शिक्षक असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. आशालता महाजन म्हणाल्या की, भक्ती ही मनाला प्रसन्नता देऊन जीवनाला संजीवनी देणारी असते. लोकनाथ लोकशिक्षक संत एकनाथांनी प्रपंच व परमार्थाची उत्तम सांगड घातली. डॉ. पाटील यांनी अत्यंत जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमातून संशोधन पूर्ण केले आणि या संशोधनाचा ग्रंथ त्यांच्या जीवनाला परीसस्पर्श करणारा ठरेल असेही त्यांनी सांगितले. राजेंद्र जावळे यांनी स्व. निशा पाटील स्मरणार्थ ओळी सादर केल्या. सूत्रसंचालन प्रा. प्रमोद आठवले यांनी तर आभार कु. भक्ती पाटील हिने मानले. डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केलेल्या आवाहनानुसार प्रा. होले यांनी पाच ग्रंथ विकत घेतले. त्यानंतर भक्तीच्या हस्ते उपस्थित सर्व श्रोत्यांना भक्ती ग्रंथाचे वाटप करण्यात आले.

फोटो ओळी – श्री संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती या ग्रंथाचे प्रकाशन करताना महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, प्रा.डॉ. आशालता महाजन, कु. भक्ती पाटील, लक्ष्मण महाराज, डॉ. अनिल झोपे, डॉ. चंद्रकांत साळुंखे, नरेंद्र नारखेडे, डॉ. दिलीप ललवाणी, प्रा. व.पु. होले आदी

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
Uncategorized

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

March 23, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
Uncategorized

समोरासमोर दुचाकींची भीषण धडक; बालकासह पाच जण गंभीर जखमी !

March 19, 2026
रायगडावरून मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात; राज ठाकरे उद्या करणार शुभारंभ
Uncategorized

रायगडावरून मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात; राज ठाकरे उद्या करणार शुभारंभ

March 8, 2026
खळबळजनक : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
Uncategorized

खळबळजनक : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 6, 2026
अजित पवार अपघात प्रकरणी FIRवरून सरकारवर राज ठाकरे यांचा हल्लाबोल; “एका तक्रारीला का घाबरता?” !
Uncategorized

अजित पवार अपघात प्रकरणी FIRवरून सरकारवर राज ठाकरे यांचा हल्लाबोल; “एका तक्रारीला का घाबरता?” !

February 27, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
Uncategorized

व्यावसायिक सहली फायदेशीर ठरतील. आज तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल.

February 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात गॅस-इंधन पुरवठ्याची पाहणी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे कठोर निर्देश

जळगावात गॅस-इंधन पुरवठ्याची पाहणी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे कठोर निर्देश

March 28, 2026
देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले

देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले

March 28, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

विवाहितेचा रस्त्यावर विनयभंग; पतीला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा !

March 28, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

जामनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

March 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group