चाळीसगाव : प्रतिनिधी
रविवार दि.२६ जुन २०२२रोजी राजर्षी, छत्रपती शाहू महाराजांची १४८ वी जयंती निमित्ताने मराठा सेवा संघा तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला जेष्ठ मार्गदर्शक सुधीर पाटील, पी.एन. तात्या पाटील, आर्किटेक्चर धनंजय चव्हाण शहराध्यक्ष, प्रशांत गायकवाड, तालुकाअध्यक्ष अरुण पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पुजन करण्यात आले.
त्यानंतर याच ठिकाणी अभिवादन सभा घेण्यात आली. प्रवक्ते पंकज रणदिवे, सचिव, मनोहर सुर्यवंशी यांनी राजर्षी शाहू महाराजांचे कार्य किती महान कार्य आहे हे येथे विषेद केले. आण्णासाहेब धुमाळ यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी उपाध्यक्ष अजय देशमुख, खुशाल पाटील, सहकार्याध्यक्ष सुनील चव्हाण, सहकोषाध्यक्ष विजय पाटील, शहरसंघटक राकेश राखुंडे, कार्यकारिणी सदस्य आर.बी.जगताप, रविंद्र पाटील, किशोर पाटील, उद्योजक आघाडी अध्यक्ष कुणाल पाटील, विधीतज्ञ, सल्लागार अॅड संतोष पाटील तालुकासचिव समाधान पाटील, डाॅ.अजय पाटील, अजय पाटील, दिपक पाटील, नितीन पाटील, गुडू पगार यांच्या सह मराठा सेवा संघाचे शहर आणि तालुका, पदाधिकारी उपस्थित होते.