मुंबई : राज्यात पेट्रोलपाठोपाठ आता डिझेल शंभरीपार गेले आहे. औरंगाबादमध्ये डिझेलचा दर सर्वाधिक 100.13 रुपये एवढा आहे. औरंगाबाद शहराच्या विकासासाठी पेट्रोलवर 3 तर डिझेलवर 2 टक्के अतिरिक्त कर लागतो. त्यामुळे ही दरवाढ इतर शहरांपेक्षा अधिक आहे. सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेल कडाडलं. पेट्रोल 31 पैसे, डिझेल 37 पैशांनी महाग झालंय. 7 दिवसांत पेट्रोल 4 रूपये, डिझेल 4.10 रू. महागलंय. या दरवाढीचा सामान्यांना फटका बसणार आहे.
सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेल कडाडले आहे. पेट्रोल 31 पैसे, डिझेल 37 पैशांनी महाग झाले आहे. तर 7 दिवसांत पेट्रोल 4 रूपये, डिझेल 4.10 रुपयांनी महाग झाले आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सामान्यांना फटका बसणार आहे. आधीच महागाईत वाढ होत असताना त्यात अधिक भर पडणार आहे.
पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोल 31 पैशांनी तर डिझेल 37 पैशांनी महागले आहे. 22 मार्चपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर एक दिवस वगळता दररोज दरांत वाढ होतेय. आजच्या दरवाढीमुळे 7 दिवसांत पेट्रोल 4 रुपयांनी तर डिझेल 4.10 रुपयांनी महागले आहे.