शेंदुर्णी ता.जामनेर : प्रतिनिधी
महाराष्ट्र दिन व आंतराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त नगरपंचायतच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम नगरपंचायतचे कर्मचारी सुनील निकम यांच्या हस्ते झाला. त्यानंतर माझी वसुंधरा अंतर्गत विजेते स्पर्धकांना प्रमाणपत्रे व गौरव चिन्ह देऊन बक्षीस वितरण समारंभ शेंदुर्णीच्या नगराध्यक्षा विजया खलसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत माझी वसुंधरा हरीत स्पर्धेचे १२ मार्च रोजी पारस मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धे अंतर्गत चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, टाकाऊ पासून टिकावू स्पर्धा राबविण्यात आली होती. ह्यात मोठ्या संख्येने सरस्वती विद्यालय, गरुड प्राथमिक व सेमी इंग्लिश, माध्यमिक, महाविद्यालय, ललवाणी शाळा, गुरुकुल मराठी -इंग्लिश मिडीयम, जि. प. उर्दू कन्या, जि. प. मराठी कन्या व मराठी मुलांची शाळा इ. शाळेतील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवीला होता. ह्या स्पर्धेत ३०० च्या वर विद्यार्थी सहभागी झाले होते. निबंध व चित्रकला स्पर्धेत १ ली ते ७ वी व ८ वी ते १२ वी असे दोन गट आणि रांगोळी व टाकावू पासून टिकावू स्पर्धा ही खुल्या गटात घेण्यात आली.
या वेळी अमृत खलसे, राजेंद्र भारुडे, अँड. देवेंद्र पारळकर, व्ही.टी.नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माझी वसुंधरा’ व स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थांना प्रशस्तीपत्र, ट्रॉफी व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमावेळी उपनगराध्यक्ष निलेश थोरात, माजी उपनगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका चंदाबाई अग्रवाल, गटनेत्या रंजना धुमाळ, नगरसेवक सतिष बारी, राहुल धनगर, नगरसेवक, नगरसेविका ,समाजसेवक पत्रकार, डॉक्टर, शिक्षक वनगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन उपनगराध्यक्ष निलेश थोरात यांनी तर आभार नगरसेवक सतिष बारी यांनी मानले.