
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शिवाजी नगरातून ममुराबाद कडे जाणारा रस्त्यावर अज्ञात व्यक्तींनी एकाची दुचाकी थांबवून चाकूचा धाक दाखवत मोबाईल व हजारो रुपये चोरून नेले आहे.
मिळालेली माहिती अशी की, शहरातील महावीर नगर परिसरात राहणारे योगेश परमानंद सोनी हे आपल्या परिवारासह राहतात. ते ८ जुलै रोजी रात्री ८ वाजता ते आपल्या दुचाकीने शहरात येत होते. या वेळेस स्मशान भूमीजवळ एका तरुणाने त्यांची दुचाकी अडवून चाकूचा धाक दाखवली त्यावर सोनी यांनी जुमानत नसताना अजून एक व्यक्ती त्या ठिकाणी येऊन सोनी यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली असता. त्यांना काहीही दिसत नव्हते त्याचवेळेसचा फायदा घेऊन आरोपींनी योगेश सोनी यांच्या हातातील बॅग मोबाईल व काही रोकड पूर्णपणे २२ ते २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमान चोरून नेला. याप्रकरणी योगेश सोनी यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेली घटना सांगितली. त्यांच्या तक्रारीवरून तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी. परदेशी करीत आहे.





















