
पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील महिला ग्रामपंचायत सदस्यांचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडून व धमकी देणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावातील महिला ग्रामपंचायत सदस्यांचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडून व धमकी देणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील एका गावात २५ वर्षीय महिला ही ग्रामपंचायत सदस्या म्हणून काम पाहतात. १ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास महिला ग्रामपंचायत सदस्या ग्रामपंचायत कार्यालयात असतांना गावातील बापूराव रामराव देवकर आणि अनंतराव रामराव देवकर यांनी कारण नसता शिवीगाळ केली. ग्रामपंचायत सदस्य असलेल्या महिलेच्या सासूला देखील मारहाण करून गळ्यातील सोन्याची होत तोडून नुकसान केले तर ग्रामपंचायत सदस्याला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत त्यांचा विनयभंग केल्याचा प्रकारसमोर आला आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य असलेल्या महिलेने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी बापूराव रामराव देवकर आणि अनंतराव रामराव देवकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद पाटील करीत आहे.