भडगाव : प्रतिनिधी
माऊली फाऊंडेशन भडगाव यांच्या वतीने पारोळा रोड, शासकीय विश्राम गृहा समोर, भडगाव येथे पाणपोईचे उदघाटन करण्यात आले. माऊली फाऊंडेशनच्या वतीने सलग सहाव्या वर्षी पाणपोई सुरु करण्यात आली आहे. पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात माऊली फाऊंडेशनचे उपाध्यक्ष आबासाहेब युवराज सुर्यवंशी यांनी नारळ वाढवून तर माऊली फाऊंडेशनच्या स्वयंसेविका संगीता जाधव यांनी फित कापुन पाणपोईचे उदघाटन केले.
याप्रसंगी वैशाली शिंदे, मनिषा पाटील, वैशाली पाटील, मीरा जाधव, देवेंद्र पाटील, प्रविण पाटील, रविंद्र कुलकर्णी, सुरेश रोकडे, प्रा.सुरेश कोळी, दिलीप महाजन, संजय सोनार कळवाडी कर, कृष्णा पाटील, उन्नती पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, पाणपोई हा उपक्रम दरवर्षी राबविला असल्याची माहिती माऊली फाऊंडेशनचे उपाध्यक्ष युवराज सुर्यवंशी यांनी दिली.