मुक्ताईनगर : प्रतिनिधी
मुक्ताईनगरला दि. १५ मे रोजी ‘वारसा संतांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा’ यामार्फत निघालेल्या जनप्रबोधन यात्रेचे ठीक सकाळी १० वाजता मुक्ताईनगर शहरात आगमन झाले. यात्रेचे प्रमुख राज्य कार्यकारणीतील पदाधिकारी माधव बावगे, महाराष्ट्र अनिसचे राज्य प्रधान सचिव, अभियान प्रमुख मनोहर जायभाये व हनुमंत मुंडे यांचे गुलाबपुष्प देऊन मुक्ताईनगर येथील प्रमुख कार्यकर्ते जळगाव जिल्ह्याचे प्रधान सचिव मोहन मेढे, शाखाप्रमुख हकीम चौधरी, प्रधान सचिव अशोक तायडे यांनी स्वागत केले.
मुक्ताईनगर येथील जुने मुक्ताईमंदिर परिसरात बाल संस्कार शिबिरात ‘वारसा संतांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा’ जनप्रबोधन यात्रा संदर्भात सविस्तर मनोगत माधव बावगे, मनोहर जायभाये, हनुमंत मुंडे यांनी व्यक्त केले. प्रस्तावना प्रधान सचिव मोहन मेढे यांनी केली. महाराष्ट्र अंनिसचे दिनांक १४ मे ते २३ मे अखेर प्रबोधन यात्रा चालणार आहे. संत गाडगेबाबा जन्मभूमी शेडगाव ते पंढरपूर हा यात्रेचा मार्ग आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही देव आणि धर्म बुडवणारी चळवळ नसुन ती संत, समाजसुधारक यांचा कृतिशील आणि विवेकी वारसा पूढे नेणारी चळवळ आहे. नागरिकांनी एक दिवस तरी प्रबोधन यात्रा अनुभवावी असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव जिल्हा प्रधान सचिव मोहन मेढे आणि अशोक तायडे, मुक्ताईनगर शाखा प्रमुख हकीम चौधरी, निलेश मेढे आणि समस्त जिल्हा कार्यकारणी यांनी केले आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मोहन मेढे यांनी केले.