चाळीसगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार आज चाळीसगाव येथे कांग्रेस च्या वतीने गॅस सिलिंडर व मोटार सायकल यांचे प्रतिमात्मक आंदोलन करण्यात आले. या वेळी चाळीसगाव येथील नायब तहसीलदार धनराळे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात मोदी सरकारने पाच राज्यांच्या निवडणूका होताच देशात अत्यावश्यक बाबी असलेल्या पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केल्याने देशात महागाईचा भस्मासुर वाढत आहे. त्यामुळे कांग्रेसने मोदी सरकारचा निषेध करून महागाई मुक्त भारत आंदोलनाची सुरुवात केली असल्याचे सांगण्यात आले.
या आंदोलनात चाळीसगाव तालुका महिला अध्यक्षा अर्चना पोळ, काँग्रेस ता.अध्यक्ष अनिल निकम, सेवादल अध्यक्ष आर डी चौधरी,अलताफ खान, रविंद्र पोळ, रविंद्र जाधव, राहुल मोरे, मंगेश अग्रवाल प्रदीप देशमुख, तात्यासाहेब अहिरराव, प्राज्वल जाधव, गयास शेख सह कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते,