यावल : प्रतिनिधी
यावल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्या ठिकाणी ढोल-ताशाच्या गजरात असंख्य मनसे सैनिकांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन मनसे जिल्हाध्यक्ष जनहीत चेतन अढळकर यांनी केले.
याप्रसंगी शरबत वाटप व छोटेखानी व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी तालुका भरातील मनसे सैनिक उपस्थित होते. त्यात तालुका उपाध्यक्ष श्याम पवार, शहराध्यक्ष किशोर नन्नवरे, शहर उपाध्यक्ष अबिद कच्ची, तालुका उपाध्यक्ष अनिल सपकाळे, अजय तायडे, विद्यार्थी सेना अध्यक्ष गौरव कोळी, राहुल पाटील, समाज सेवक मनोज महेश्री, नितीन बोरवले, राहुल पाटील, गजेंद्र माळी, राहुल सुतार, गोविंदा सुतार, शिवाजी अस्वार, नितीन बारी, कुणाल बारी, सचिन बारी, प्रवीण माळी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
