मिथुन: रविवार तुमच्यासाठी शुभ असणार आहे. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न कराल. परिश्रमाचे अनुरूप लाभ न मिळाल्याने निराशा होऊ शकते.
कर्क : तुम्ही तुमच्या प्रतिभेने लोकांना प्रभावित कराल. जर तुम्ही हुशारीने काम केलं तर तुम्ही अधिक पैसे कमवू शकता. घरातील कार्यालयीन काम करणाऱ्या लोकांमुळे वरिष्ठ आनंदी राहतील.
सिंह: रविवार तुमच्यासाठी नवीन भेट घेऊन आला आहे. व्यावसायिकांसाठी दिवस चांगला जाणार आहे. लोकांच्या मदतीने तुमचं उत्पन्न वाढेल. व्यावसायिक क्षेत्रात त्याच प्रकारचे काम करताना थोडा कंटाळा येऊ शकतो.
कन्या : रविवार तुमच्यासाठी खूप चांगला परिणाम देणारा आहे. इतरांचे सहकार्य मिळणं तुम्हाला सोपं असेल. नवीन कपडे किंवा काही घरगुती वस्तू महिला खरेदी करू शकतात.
तूळ: जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन सकारात्मक असेल. मित्रांच्या मदतीने रखडलेली कामं पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या व्यवसायात काही नवीन कल्पना मांडू शकता. व्यवहाराशी संबंधित कामे पूर्ण करू शकाल.
वृश्चिक : रविवारचा दिवस तुमच्यासाठी शांततापूर्ण राहील. तुम्ही तुमच्या व्यापार व्यवसायात बुद्धीचा वापर कराल म्हणजे तुमचं काम बिघडण्यापासून वाचेल. पैशाची तुमची चिंता दूर होऊ शकते.
धनु : तुमचा दिवस शुभ असणार आहे. विचारपूर्वक केलेल्या कामांची गती मजबूत असेल. तुम्हाला करिअरशी संबंधित काही नवीन आणि मनोरंजक ऑफर मिळू शकतात.
मकर : दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. सामाजिक क्षेत्रात तुमची आवड वाढण्याची चिन्हं आहेत. तुम्ही तुमच्या व्यवसायात काही नवीन कल्पना मांडू शकता. व्यवहाराशी संबंधित कामे पूर्ण करू शकाल.
कुंभ : तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. तुम्ही केलेल्या कोणत्याही कामाचं लगेच फळ मिळेल. मुलांसाठी तुम्ही कोणतीही गुंतवणूक करू किंवा मालमत्ता घेऊ शकता.
मीन : नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. नवीन ध्येय ठेवण्यासाठी दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढीसाठी केलेले प्रयत्न आता यशस्वी होताना दिसतील. जुन्या कर्जातून सुटका होईल. आरोग्याकडे लक्ष द्या.