
पाचोरा : प्रतिनिधी
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने, सचिव वरूण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाने राज्यभर सुरू असलेल्या युवासेना सद्स्य नोंदणी अभियानाचा भाग म्हणून दि. २६ एप्रिल रोजी पाचोरा शहरात नोंदणी अभियान राबवण्यात आले. शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय व महाराणा प्रताप चौक याठिकाणी सदर नोंदणी करण्यात आली. या नोंदणीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असुन ५०० हुन अधिक युवकांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली. पुढील टप्यात आता ग्रामीण भागात सदर नोंदणी उपक्रम राबवण्यात येईल.
यावेळी शहर प्रमुख किशोर बारवकर, युवानेते सुमित पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख जितेंद्र जैन, उपनगराध्यक्ष शरद पाटे, सौरभ चेडे, संदीपराजे पाटील, योगेश पाथरवट, जितेंद्र पाटील, सागर पाटील, राहुल पाटील, आबा कुमावत, सुनिल गौड, मोहित राजपूत, शाहरुख, जय बारवकर, बापू हटकर, भूषण पाटील, शुभम इंशी, विजय भोई सह मोठ्या संख्येने युवासैनिक उपस्थित होते.




















