मुबई : वृत्तसंस्था
राज्यात करोना संसर्ग पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. शिवाय आता शाळा, महाविद्यालये देखील सुरू झाली आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा काहीसे चिंताजनक वातावरण निर्माण होऊ लागले आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यभरात ४ हजार २४ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,१९,४४२ झाली आहे.
याशिवाय, आज ३ हजार ०२८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आजपर्यंत एकूण ७७,५२,३०४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.८९ टक्के एवढे झाले आहे.
तर, राज्यात आज दोन करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१४,२८,२२१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,१९,४४२ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
Maharashtra reports 4024 new #COVID19 cases, 3028 recoveries and 2 deaths in the last 24 hours. Active cases 19,261
According to the latest report of BJ Medical College, Pune, 4 patients of BA.5 variant have
been reported in the state. pic.twitter.com/9MN2E4NvmT— ANI (@ANI) June 15, 2022
राज्यात बी ए.५ व्हेरीयंटचे आणखी ४ रुग्ण
बी जे वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बीए. ५ व्हेरियंटचे आणखी ४ रुग्ण राज्यात आढळून आले आहेत. या पैकी प्रत्येकी १ रुग्ण मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे येथील आहे. हे सर्व रुग्ण १९ ते ३६ वर्षे वयोगटातील महिला आहेत. यापैकी ३ रुग्णांची जनुकीय क्रमनिर्धारण तपासणी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे आणि एका रुग्णांची तपासणी बी जे वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे करण्यात आलेली आहे. हे सर्व रुग्ण २६ मे ते ९ जून २०२२ या कालावधीतील असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.