फैजपूर : प्रतिनिधी
रावेर मतदार संघातील फैजपूर नगरपरिषदेच्या क्षेत्रातील विकास कामांसाठी सतत प्रयत्नशील असलेले आमदार शिरीष चौधरी यांनी राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून फैजपूर शहरातील विकासकामांसाठी ना. एकनाथजी शिंदे नगरविकास, मंत्री, ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत मागणी केली होती. सदर मागणीला मंत्री महोदय यांनी तत्काळ निधी उपल्बध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी फैजपूर नगरपरिषद क्षेत्रातील विकास कामांसाठी विशेष रस्ता अनुदान योजने अंतर्गत सन २०२१-२२ या वर्षासाठी लेखाशिर्ष (३०५४ ००२२) नुसार मंजुरी दिली.
सदर विकास कामे १) म्युनिसिपल हायस्कूलच्या दुसऱ्या मजल्यावर स्लँबला ब्रिकवँट व वॉटर प्रुफींग करणे, १२ लक्ष २) यावल रोडवरील भारत एंटरप्राइज पासून जानकी नगर पर्यंत सर्व रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे ३० लक्ष. ३) आशिष सराफ नगर मध्ये खडीकरण करणे २० लक्ष, ४) खिरोदा रोड पासून सतपंथ समाज वैकुंठ धाम पर्यंत रस्ता खडीकरण करणे १० लक्ष, ५) यावल रोडवरील अँग्रीमार्ट पासून ते हंबर्डी रस्त्यापर्यंत खडीकरण व डांबरीकरण करणे २० लक्ष ६) आसाराम नगर मधील किशोर वाघुळदे यांच्या घरापासून ते संजय चौधरी यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे २० लक्ष ७) आसाराम नगर मधील किशोर पाटील यांच्या घरापासून ते मिरची ग्राऊंड ते निळू सराफ यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे ३५ लक्ष ८) लक्ष्मी नगर पाण्याच्या टाकी परिसरातील रस्ते डांबरीकरण करणे ४० लक्ष ९) लक्ष्मी नगर मधील किरण भिरूड ते खंडेराव वाडी रस्ता कॉक्रीटीकरण करणे २० लक्ष १०) सुन्नी मज्जिद पासून अमतमद चँरिटी हॉस्पिटल ते कळमोदा रोड खडीकरण व कॉक्रीटीकरण करणे २० लक्ष ११) मिल्लत नगर मध्ये जमील डायनामा यांचे घरापासून ते गयास लसूनवाले यांचे घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स कॉक्रीटीकरण करणे २५ लक्ष १२) मिल्लत नगर मध्ये फातिमा ऊर्दू स्कूल पासून विस्डम इंग्लिश स्कूल गट नं. ५०३ पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण करणे १० लक्ष १३) ताहानगर मध्ये मस्जिद खलील परिसरात खडीकरण व कॉक्रीटीकरण करणे २० लक्ष १४) आराधना कॉलनीत रमेश जोगी यांच्या घरापासून ते अनिल गुळवे यांचे घरापर्यंत ते महादेव मंदीर पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे १५ लक्ष १५) इस्लमापुरा भागात अब्दुल रहेमान अंतुले यांचे घरापासून ते कालू सरदार यांचे घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे ३३ लक्ष असा एकूण ३.३० कोटी रुपयांचा निधी फैजपूर नगरपरिषदला विकास कामांसाठी ‘विशेष रस्ता अनुदान’ योजनेंतर्गत मंजूर झाला असून लवकरच या कामांना सुरुवात होईल अशी माहिती खिरोदा आमदार कार्यालयाकडून मिळालेली आहे.