लासुर :प्रतिनिधी
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आरोग्य सहाय्यीका आशा पंडीत गजरे यांनी आरोग्य क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीची दखल घेत साधना न्यूजच्या जीवनगौरव पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. त्याचे औचित्य साधत लासुर पालीवाल समाजाच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला.
दरम्यान कि. शि. वि. प्र. चे माजी उपाध्यक्ष अजय पालीवाल यांनी आशा गजरे यांनी कोरोना काळात केलेल्या सेवा मनोगतातून अधोरेखित केली. याप्रसंगी माजी पं.स सभापती गोपाळ सोनवणे, पालीवाल समाज अध्यक्ष विशाल पालीवाल, सचिव दिपक पालीवाल, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पालीवाल, राजेंद्र पालीवाल, नेमीचंद पालीवाल, अरुण पालीवाल, दिलीप पालीवाल, वसंत पालीवाल, आशिष पालीवाल, गणेश पालीवाल, दिपेश पालीवाल यांसह पालीवाल समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार परेश पालीवाल यांनी केले.
