मलकापुर : प्रतिनिधी
शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया ही लागवडीपूर्व करावयाची एक सोपी पण परिणामकारक प्रक्रिया आहे. याने पेरणी नंतर बुरशीनाशक फवारणीच्या खर्चात बचत होते. योग्य प्रक्रिया केलेले बियाणे पेरल्याने कमी अथवा जास्त ओलाव्यातही पीकाची एकसारखी उगवण होते . बीजप्रक्रिया केल्यामुळे पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते, पीक जोमदार येते, जमिनीत नत्राचे स्थिरीकरण होते व जमिनीतील अपायकारक जीवाणूंसून पिकाचे संरक्षण होते.
शेतकऱ्याने बीज प्रक्रिया करत असताना जैव खताचे वापर करावे कारण जैव खते जमिनीतील वातावरणातील नायट्रोजन आणि शेंगावर्गीय पिकांच्या मुळांच्या गाठी निश्चित करतात आणि ते झाडांना उपलब्ध करून देतात. ते फॉस्फेटचे अघुलनशील प्रकार जसे की ट्रायकॅल्शियम, लोह आणि अल्युमिनीम फॉस्फेट्स उपलब्ध स्वरूपात विरघळवतात. ते मातीच्या थरांमधून फॉस्फेट काढतात. ते हार्मोन्स आणि अँटी मेटाबोलाइट्स तयार करतात जे मुळांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. ते सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात आणि जमिनीतील खनिजीकरणास मदत करतात. बियाणे किंवा मातीवर लावल्यास, जैव खते पोषक तत्वांची उपलब्धता वाढवतात.
पुनर्लावणी केलेल्या भातासाठी, रोपांची मुळे 5 किलो ईए एझोस्पिरिलम फॉस्फोटिकाच्या द्रावणात 8 ते 10 तास बुडवून ठेवण्याची शिफारस केली जाते. या प्रकारे शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केली पाहिजे जेणे करुन जमिनीतील खानिजिकरणास मदत होईल व बियाणे पोषक तत्वाचे ठरतील अशा प्रकारची माहित कृषी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना दिली.
यावेळी उपस्थित समर्थ कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य नितिन मेहेत्रे , रावे समन्वयक प्रा मोहजीतसिंग राजपूत, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख प्रा शुभम काकड यांनी शेतकऱ्याना मार्गदर्शन केले. यावेळी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच समर्थ क्रुषी महाविद्यालयाचे विद्यार्थी विक्रांत गवई,गौरव देशमुख,आशिष गारमोडे,श्रीगणेश घिसड,सुदर्शन देशमुख,टाकेश चौरागडे,सत्यम गव्हाने,विशाल गावंडे,हार्दिक गिर्हे,प्रसाद गोलांडे,संकेत चित्ते,पवन घुबे,विश्वजीत गवई,दिनेश लिंगा वड्डे,गणेश धोत्रे,हे कृषिदूत उपस्थित होते.