
पारोळा : प्रतिनिधी
पारोळा शिवसेनेच्यावतीने खा,संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन जिल्हाप्रमुख डॉ, हर्षल माने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेले आहे
याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा शहरातील शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ, हर्षल माने यांच्या नेतृत्वाखाली खा, संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ कजगाव रस्त्यावरील कृष्णा हाॅस्पिटल येथुन मोर्चा काढण्यात आला. तसेच शहरातील महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या वेळी केंद्र सरकार व ई,डी, च्या विरोधात घोषणा देण्यात आल्या, तसेच पारोळा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांना निवेदन देण्यात आले, यावेळी जिल्हा प्रमुख डॉ हर्षल माने,प्रा,आर बी, पाटील, अशोक मराठे, तसेच शहरातील इतर शिवसैनिक उपस्थित होते.




















