
पुणे : प्रतिनिधी
राज्यात गेल्या दीड महिन्यापासून शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटात वाक् युद्ध सुरू असताना आज (मंगळवारी) पुण्यातील या दोन्ही गटातील वाद शिगेला पोहचला. बंडखोर नेते उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी कात्रज येथे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील कात्रज भागात उदय सामंत हे मुंबईच्या दिशेने जात असताना शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवली. त्यांची गाडी अडवत गाड्यांवर फटके मारत चपला आणि बाटल्या देखील फेकण्यात आल्याचे समोर आले आहे. जणू काही उदय सामंत यांना शिवसैनिकांनी कात्रजचा घाटच दाखविला.
राज्यात गेल्या काही दिवसापासून सत्तेचा सारीपाट सुरू होता. शेवटी शिंदे यांनी ४० आमदार घेवून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले. त्यामुळे राज्यातील शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप होता परंतु ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर शिवसैनिक शांत झालेले होते. मात्र अशातच आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री शिंदे हे पुणे दौऱ्यावर आले यांच्यासोबत डझनभर आमदारही होते. यावेळी माजी मंत्री उदय सामंत हे आदित्य ठाकरे यांचा कात्रज परिसरात कार्यक्रम संपल्यानंतर शिवसैनिक घरी जात असताना रस्त्यामध्ये उदय सामंत यांचा वाय दर्जाची सुरक्षा असलेला ताफा जात असताना शिवसैनिकांना दिसला यावेळी हजारो शिवसैनिक यांच्या ताफ्यामध्ये घुसत सामंत यांची गाडी फोडली. यावेळी चालकाच्या लक्षात येताच. सामंत यांच्या चालकाने गाडी पळवली. त्यामुळे कुठलीही अनुचित प्रकार घडला नाही.तर याठिकाणी असलेल्या पोलीस पथकाने लागलीच गर्दीला पांगविला.
हल्ल्यानंतर काय म्हणाले माजी मंत्री सामंत
माझा ताफा कोणी आडवला नाही, गाडी सिग्नलला थांबलेली होती, तेव्हा काही गाड्यामध्ये मुलं बेसबॉलच्या स्टीक आणि आणि दगड घेऊन आले. त्यांनी गाड्यांवर हात मारायला, मला शिवीगाळ करायला सुरुवात केली, हल्लेखोर पोलिसांच्या अंगावर आल्याचे सामंत म्हणाले.





















