चोपडा : प्रतिनिधी
युवा संस्कार व व्यक्तिमत्त्व विकास चोपडा तालुका आदिवासी भागातील सत्रासेन गावात गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवा संस्कार व व्यक्तीमत्त्व विकास पाचदिवशीय शिबिरचे उद्घाटन झाले.
राज्याचा सत्तासंघर्षात : शिंदेंना मुख्यमंत्री करा ; बंडखोर आमदारांची मागणी
सुरवातीला स्वागत दीपप्रज्वलन झाले तसेच शिबीरा घेण्याचा मुख्य उद्देश म्हणजे एकंदरीत युवकाच्या कलागुणा वाव मिळावा , आजच्या युवकाचा गावाकडे बघण्याचा दृष्टीकोन गांधी च्या जिवन शैली आत्मसात करून ग्रामीण कार्यकर्ते तयार करणे, गांधी विचारांचा प्रसार करून लोकांना लोकांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रबोधन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात उपस्थित मान्यवर प्रमुख पाहुणे गांधी रिसर्च फौंडेशनचे गिरीश कुलकर्णी, सत्रासेन माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या व चोपडा माध्यमिक पतपेढी उपाध्यक्षा प्राचार्य वंदना भादले , प्राथमिक मुख्याध्यापक जगदिश महाजन व रोटरी क्लबचे कोषाध्यक्ष, उच्च माध्यमिक शिक्षक भालचंद्र पवार उपस्थित होते.
या शिबिरात गौरयापाडा, वैजापूर, खारयापाडा गावातील युवकाचा सहभाग घेतला. यात 33 युवक आहेत. या कार्यक्रमात महत्वपूर्ण भुमिका विक्रम असवार ,चंद्रकांत चौधरी पी जी डिपलोमा विद्यार्थ्यांनी योगदान दिले, सत्रासेन आश्रमशाळा संस्थेचे अध्यक्ष रविंद्र भादले, उपाध्यक्ष धनंजय भादले व सचिव प्रा. ज्ञानेश्वर भादले यांच्या कडून कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व भौतिक सुविधा पुरविण्यात आल्या.