लोहारा ता.पाचोरा : प्रतिनिधी
पळासखेडा बुद्रुक जामनेर परीसरात गेल्या दोन-तीन महिन्यापासून एक मनोरुग्ण महिला पळासखेडे गावात व बस स्टँड परिसरात रात्री अपरात्री जोरजोरात ओरडणे, नेहमी बडबडत असणे अशा अवस्थेत आढळत होती. ती मनोरुग्ण असल्याने मुलं तिची टिंगलही करत. या बाबतची माहिती पळसखेड माणुसकी समूहाचे सदस्य योगेश वराडे यांना मीताच सदर महिलेस मदत करण्यासाठी माणुसकी ग्रुप वर संदेश पाठवून जळगाव माणुसकी समूहाचे समाजसेवक गजानन क्षीरसागर यांना सदरील मनोरुग्ण महिलेची माहिती दिली.
गजानन क्षीरसागर,चंद्रकांत गीते यांनी तात्काळ रात्री पळासखेडा बुद्रुक घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम चालु केली असता,एक महिला बस स्टँड परिसरात झोपलेली आढळून आली. चौकशी केली असता ती काहीतरी बडबडत होती. प्रश्न प्रश्नांना व्यवस्थित उत्तर देत नव्हती, परंतु गावातील व्यक्तींनी सांगितल्याप्रमाणे ती इथेच राहत आहे व आम्ही गावातील व्यक्ती तिला खाण्यासाठी देत आहोत. परंतु ती काही दिवसापूर्वी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आम्हाला दिसली. आम्ही काही गावातील महिलांच्या मदतीने तिला नवीन कपडे दिले व तुम्हाला कॉल केला असे त्यांनी सांगितले.
गावातील पोलीस पाटील यांना बोलावून तात्काळ नंतर जामनेर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. या मनोरुग्ण महिलेला खाजगी वाहनांनी मानवसेवा तिर्थ वेले, चोपडा नरेंद्र पाटील यांच्या येथे अन्न वस्त्र निवारा याकरीता दाखल करन्यात आले.
यावेळी समाजसेवक गजानन क्षीरसागर ,योगेश वराडे (जळगाव पोलीस),चंद्रकांत गीते, कैलास पाटील, जामनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र ठाकरे, होमगार्ड सुरज चौधरी, उमेश बुंदले, मनीषा धमाण, पळासखेडा बू गावकरी, माणुसकी समूहाच्या टीमने मदत कार्य केले.