वरणगाव : प्रतिनिधी
आयुध निर्माणी वसाहती मधील रहिवाशी व दिपनगर येथे आय टी आय शिक्षण घेण्याऱ्या युवतीने ओढणीचा गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १८ बुधवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली.
वरणगाव पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार असे की, आयुध निर्माणीतील कर्मचारी शरद रतन पगारे रा मोडीफाइड क्वॉ न १९४ मध्ये आपल्या पत्नी व दोन मुली व मुला सोबत राहतात.
त्यातील आकांक्षा शरद पगारे ( १९ ) हि दिपनगर येथे आय टी आय चे शिक्षण घेत होती दि १८ रोजी सकाळी आकारा वाजेच्या सुमारास आकांक्षा हि दिसत नसल्याने मुलगा वैभव पगारे याने त्यांच्या आईस दीदी घरात दिसत नसल्याचे विचारले असता इकडेच कुठेतरी असेल बघ असे आईन सागीतल्याने तो घराच्या छतावर बघण्यास गेला नतंर आकांक्षा हि तिच्या ओढणीचा गळफास गळ्याला लावून लटकलेल्या अवस्थेत दिसतात धवत पळत आईला सागीतले व आकाक्षास आयुध निर्माणीतील रुग्णालयात दाखल केले तिला डॉ.समीर महाकले यांनी तपासून तिला मृत घोषित केले. मयत आकांक्षा हिच्या आत्महत्या करण्या मागील नक्की काय कारण आहे हे मात्र समजू शकले नाही. या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला वैभव पगारे याच्या खबरीनुसार अकस्मत मृत्यू ची नोंद करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपास सह फौजदार नरसिंग चव्हाण हे करीत आहे