अमळनेर : विक्की उत्तम जाधव
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील गांधली येथील दहा बालकानी एरंडीसदृश्य बिया खाल्याने त्यांना विषबाधा झाली आहे. मुलांना संडास आणि उलट्यांचा त्रास होत आहे. एकाची प्रकृती गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गांधली येथील जोया पिंजारी (९), अयान पिंजारी (११), अर्जुन भिल (१०), करण सोमा भिल (९), अक्षरा भिल (१०), नर्गिस पिंजारी (३), गोकुळ भिल (१२), अश्विनी भिल (११), संगीता संदानशीव (१०), किरण भिल (११, सर्व गांधली) ही सर्व मुले ५ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मंदिराच्या प्रांगणात खेळत असताना एका मुलीने एरंडीच्या बियांसारखा पदार्थ आणला. काहींनी एक दोन बिया तर काहींनी जास्त झाल्यामुळे सुमारे ३:३० वाजेच्या सुमारास त्यांना अचानक संडास व उलट्या होऊ लागल्या. सुरुवातीला त्यांना अमळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले होते तेथून त्यांना ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रांजली पाटील, डॉ. प्रकाश ताडे, बालरोगतज्ज्ञ जी. एम. पाटील यांनी उपचार सुरू केले. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी रुग्णालयात भेट देवून प्रकृतीबाबत माहिती घेतली. मंत्री अनिल पाटील यांनीही तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या.