जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२३
पिंप्राळा परिसरातील एक भागातील ३२ वर्षीय महिला तिच्या १२ वर्षीय मुलीसह दोन दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. यासंदर्भात विवाहितेच्या पतीने रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यात म्हटले आहे की, त्यांची पत्नी व मुलगी हे दि. २ ऑगस्टपासून कोणाला काहीही न सांगता रागाच्या भरात निघून गेले आहेत. त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ते न सापडल्याने फिर्याद देण्यात आली. याप्रकरणी ३ ऑगस्ट रोजी हरवल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ नीलेश पाटील करीत आहेत.