जळगाव मिरर | २१ सप्टेंबर २०२३
भुसावळ तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देऊन व परिवाराला त्रास देण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संशयित आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. यापूर्वी २०१९ ते आतापर्यंत पीडित मुलगी ही अल्पवयीन असताना तिला लग्नाचे आमिष दाखवत त्याच गावात राहणारा रुपेश मंगल पाटील याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच तू माझ्यासोबत नाही आली तर तुझ्या घरच्या लोकांना त्रास देईल अशी धमकी दिली. त्यामुळे तिने हा प्रकार घरच्यांना सांगितला नाही. दरम्यान २ ऑगस्ट रोजी हा प्रकार तिला असह्य झाल्याने आपल्यावर झालेली आपबिती तिने घरच्यांना सांगितला. त्यानुसार तिच्यासह नातेवाईकांनी बुधवार २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी रुपेश मंगल पाटील यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णा पिंगळे करीत आहे.