जळगाव मिरर | १९ मे २०२३
देशात अनेक कंपनीची टेलिकॉम कार्यरत आहेत. त्यात ग्राहकांना अनेक मोठ्या संधी कंपनी उपलब्ध करून देत असते. त्यामुळे ग्राहकाना एकत्रित ठेवण्यासाठी कंपनी विशेष स्कीम जाहीर करीत असते. त्यातील एक नेटवर्क म्हणजे व्होडाफोन आयडिया गेल्या अनेक वर्षपासून देशात सक्रीय असलेल्या या कंपनीने आपल्या ग्राहकासाठी विशेष प्लान सक्रीय केला आहे. ज्यातून ग्राहकांच्या पैश्याची बचत होणार आहे.
व्होडाफोन आयडियाच्या या प्लॅनची किंमत फक्त 45 रुपये आहे. या नवीन 45 रुपयांच्या प्लॅनची वैधता 180 दिवसांची आहे. टेलिकॉम ऑपरेटर्सच्या इतर विद्यमान प्लॅनच्या तुलनेत या किमतीत इतकी वैधता देणारा प्लान तुम्हाला सापडणार नाही.
Vi ने मिस्ड कॉल अलर्ट प्लॅन फक्त 45 रुपयांमध्ये लाँच केला आहे. हा प्लॅन 180 दिवसांसाठी म्हणजे सुमारे 6 महिन्यांसाठी वैध असेल. हा मिस्ड कॉल अलर्ट प्लॅन आहे ज्यामध्ये यूजर्सना कॉलिंग आणि डेटाची सेवा मिळणार नाही. तुमचा फोन कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असेल तेव्हा तुम्हाला कोणी कॉल केला आहे हे तुम्हाला समजेल. म्हणजेच, कॉलिंग आणि डेटासाठी तुम्हाला या प्लॅनसोबतच दुसरा प्लॅन चार्ज करावा लागेल.
देशात 5G च्या शर्यतीत रिलायन्स जिओ आणि एअरटेल पुढे गेले आहेत. त्याच वेळी, Vodafone Idea ने अद्याप त्यांची 5G सेवा लाँच केलेली नाही. परंतु ती आपल्या 4G प्रीपेड प्लॅन्समध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन प्लॅन आणत आहे. ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी कंपनीनं नवीन प्लॅन लाँच केले आहेत. यासोबतच मिस्ड कॉलसाठी स्वतंत्रपणे प्लॅन सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, काही कंपन्या आपल्या काही प्लॅन्ससोबत मिस्ड कॉल अलर्ट सेवा मोफतही देत आहेत
