
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील हरी विठ्ठल नगर येथे राहणाऱ्या २० वर्षे तरुणांनी राजमार्ती नगरातील एका अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.
सविस्तर वृत्त असे की, हरिविठ्ठल नगरातील रहिवासी असलेला कृष्णा सुधीर अहिरे (वय-20) हा मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. आज रविवार ४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास राजमालती नगरातील संस्कृती अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरून खाली कोसळून ठार झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, कृष्णा अहिरे यांनी खाली पडला नसून त्याचा घातपात केल्याचा आरोप त्याचे वडील सुधीर अहिरे यांनी केला आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला होता. मयत कृष्णा अहिरे हा वडील सुधीर अहिरे, आई अनिता अहिरे आणि भाऊ चेतन अहिरे यांच्यासह हरी विठ्ठल नगर असा परिवार आहे.




















