अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर शहरातील माहेर असलेल्या एका विवाहितेचा सासरच्या मंडळीनी 2 लाखांसाठी छळ करीत असल्याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरुन अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, शहरातील पैलाड भागातील माहेर असलेल्या विवाहिता सरला मुकेश गायकवाड (वय 21) यांचा विवाह सुरत जिल्ह्यातील ठिगरावाडी येथील मुकेश गायकवाड यांच्यासोबत झालेला आहे. विवाहितेला दि.31 जुलै 2023 पासून ते आजपोवेतो त्यांना सासरचे मंडळी मुकेश गायकवाड, लताबाई गायकवाड, भगवान गायकवाड, गणेश गायकवाड, शितल गायकवाड, मनिषा सपकाळे, उषा आगळे यांनी सर्वांनी मिळून विवाहितेला 2 लाख रुपये तुझ्या वडिलांकडून गाडीसाठी आणावे नाहीत तर तुला आम्ही फारकती देवून टाकू असे म्हणत शारीरीक व मानसिक छळ करीत असतांना विवाहितेने वडिलांना फोन करून बोलावून घेतले असता. त्यांच्यासोबत अमळनेर येथे निघून आल्या. त्यानंतर त्यांनी अमळनेर पोलिस स्थानक गाठत सासरच्या मंडळीविरोधात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ.सुनिल पाटील हे करीत आहेत.





















