जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२५
अमळनेर तालुक्यातील करणखेडा येथे शेतात लाकडे तोडायला गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना दि.१२ रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील करणखेडा येथील २२ वर्षीय विवाहित महिला दि.१२ रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास शेतात लाकडे तोडायला गेली असता तिथे गोविंद युवराज भील (रा. करणखेडा) हा आला. सदर विवाहितेने त्याला लाकडाची मोळी उचलून डोक्यावर ठेवायला सांगितले. त्यावेळी त्याने महिलेला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याने सदर महिला लाकडे फेकत घाबरून पळून गेली. तीने घरी जाऊन आपल्या नातेवाईकांना झालेला प्रकार सांगितला. या पीडित महिलेच्या तक्रारीवरून मारवड पोलिसांत गोविंद युवराज भील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेकॉ शरीफ पठाण हे करीत आहेत.