जळगाव मिरर । ९ ऑगस्ट २०२३
राज्यात गेल्या काही महिन्यापासून एसटीच्या अपघातामध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे खराब रस्ते आणि गाड्या खराब यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. महामार्गावर एका आयशरला ओव्हरटेक करत असताना एसटी थेट ३० फूट खाली कोसळल्याने भीषण अपघात झाल्याची घटना रात्री घडली आहे. या अपघातात २२ जण जखमी झाल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्याजवलील एका फाट्याजवळ आयशरला ओव्हरटेक करीत असताना पुसदकडून मुंबईला जाणारी बस ३० फूट खाली कोसळल्याने बस मधील २२ प्रवासी जखमी झाले असून यातील तीन प्रवासी उपचारासाठी जालना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये 42 प्रवासी प्रवास करीत होते. या अपघातात बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खाली कोसळली. यावेळी ग्रामस्थांनी व पोलिसांच्या मदतीने प्रवाश्यांना बाहेर काढून मदतकार्य सुरू होते.