
जळगाव मिरर । २ नोव्हेबर २०२२
पारोळा शहरातील स्टेट बँकेसामोरील लावलेल्या दुचाकीवरील ३५ हजार रुपये असलेली पिशवी अनोळखी चोरट्यांनी लांबविली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील आझाद चौकातील रहिवासी गोकुळ माधवराव आढाव(७६) हे स्टेट बँक समोरील मोकळ्या जागेत लावलेल्या दुचाकीवर ३५ हजार रुपये असलेली पिशवी लावलेली होती, कुणी तरी अनोळखी चोरट्याने ती पिशवी दि १ रोजी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ.बापूराव पाटील हे करीत आहेत.




















